रावेर, प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गरीब लाभार्थांना रेशनद्वारे मिळणारी ८७ क्विंटल साखर गोडाऊनवर प्राप्त झाली आहे. ही साखर जुलै, ऑगस्ट, सप्टेबर या महिन्यांमध्ये गरीब कुटुंबा मिळणार असल्याची माहिती गोडाऊन किपर डी. के. पाटील यांनी दिली.
रावेर तालुक्यातील गरीब लाभार्थांना रेशनद्वारे मिळणारी ८७ क्विंटल साखर गोडाऊनवर प्राप्त झाली आहे. ही साखर जुलै, ऑगस्ट, सप्टेबर या महिन्यांमध्ये गरीब कुटुंबाना अंत्योदय रेशन कार्ड असलेल्यांना मिळणार आहे. तरी तालुक्यात अंत्योदय लाभार्थी असलेले गरीबांनी साखरकडे लक्ष ठेऊन घेऊन जावे. सोबत राज्यसरकारचे नियमित गहू व तांदूळ देखिल वाटप सुरु आहे. तसेच केंद्र सरकारचे गहू व तांदूळ मोफत वाटप असून अद्याप धान्य प्राप्त झालेले नसल्याची माहिती पुरवठा निरिक्षक नागरगोजे यांनी दिली.