सरकारच पत्र मिळाल नाही ; शेतकरी आंदोलकांची भूमिका

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेसाठी निमंत्रित केलेले असतांना सरकारच कोणतच पत्र मिळाल नसल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टकैत यांनी केला आहे.

शेतकरी नेत्यांसोबत केंद्र सरकराने तीन बैठका घेतल्या आहेत, मात्र या बैठतील चर्चा निष्फळ ठरली. यानंतर रविवारी रात्री उशिरा कृषी मंत्रालयाकडून ४० शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रणाचे पत्र पाठवले गेले. शेतकरी संघटनांनी बैठकीची तारीख निश्चित करावी असेही केंद्राकडून कळवण्यात आलं होतं. मात्र, चर्चेसाठी पाठवण्यात आलेलं पत्र मिळालंच नसल्याचं शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टकैत म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेलं बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भातील कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही. केंद्र सरकार जोपर्यंत तीन कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत घरी न जाण्याचा निश्चय शेतकऱ्यांनी केला आहे. सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी महिन्यापेक्षा अधिक काळ लागेल. चर्चेसाठी सरकारनं आमच्याकडे यावं, असं टकैत यांनी म्हटलं आहे.

Protected Content