प्रांताधिकारी व तहसीलदारांना अमळनेरकरांचा सहृदयी निरोप..!

4e279cbb fe68 4120 996c d8ffa24dd626 1

4e279cbb fe68 4120 996c d8ffa24dd626 1

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रांताधिकारी संजय गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांची नुकतीच बदली झाली आहे. पू. सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व शिवशाही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोघं अधिकाऱ्यांना सहृदयी निरोप नुकताच देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस ओ माळी होते.प्रमुख पाहुणे म्हणून सानेगुरुजी वाचनालयाच्या उपाध्यक्षा डॉ माधुरी भांडारकर व माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे होते.याप्रसंगी धनदाई कॉलेज च्यावतीने दिला गेलेला ‘मनोयुवा’ पुरस्कार प्राप्त निवृत्त प्रांताधिकारी एच टी माळी, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पी आर काटे,गृहउद्योग क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या पुष्पाताई भामरे,सुवर्णपदक प्राप्त अंकिता जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

या दोघाही अधिकाऱ्यांनी अमळनेरमध्ये तीन वर्षांचा कालावधी घालवला. त्यामुळे अमळनेरकरांचे त्यांच्याशी प्रशासकीय व भावनिक नात जुळले होते. त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे आद्य कर्तव्य असल्याचे ओळखून पू. सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक व्ही ए पवार व शिवशाही फाउंडेशन चे संस्थापक जयेशकुमार काटे व उमेश काटे यांनी हा कृतज्ञता सोहळा घडवून आणला. दोघेही अधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर असल्याने अमळनेरकरांनी अनेकदा अनुभवले आहे.शाळा, महाविद्यालयात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं.अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळात झाली.अशा या कर्तव्यपारायणअधिकाऱ्यांचा शिवरायांची प्रतिमा भेट देऊन शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी सत्कार केला.

 

सत्काराला उत्तर देतांना दोघा अधिकाऱ्यांनी अनेक आठवणीनां उजाळा दिला. संजय गायकवाड यांनी सांगितले की अमळनेरला सांस्कृतिक, औद्योगिक वारसा असला तरी हल्लीच्या काळात मात्र हा वारसा खालावला आहे.त्याला जपा, असा सल्ला दिला. प्रदीप पाटील म्हणाले की अमळनेर माझ्या कायम लक्षात राहील.अमळनेरकरांचे मला खूप चांगले सहकार्य मिळाले. अनेक शिक्षक, विद्यार्थी,संघटनेचे पदाधिकारी,वाचनालयाचे संचालक मंडळ, माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी,डी ए धनगर,निरंजन पेंढारे ,दत्ता सोनवणे,भिमराव जाधव, हेमंत सिसोदे, ग.का.सोनवणे, तुषार पाटील, बी एच चौधरी,राहुल पाटील,राहुल बहिरम,सुशील भदाणे, शिवाजी पाटील,शरद पाटील, संदीप ढोले,टी के पावरा, गोपाल हडपे, व्ही एन ब्राम्हणकर,चंद्रकांत पाटील, अशोक पाटील,जगतराव निकुंभ,नरेंद्र पाटील,अरुण शिंदे,सुमित धाडकर, पी एस विंचूरकर, सी एस पवार,अजय धनगर ,प्रशांत पाटील,रविंद्र मोरे,प्रा पी के पाटील,भटू वाणी,हिंमत भोई,जयंत वानखेडे,अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही ए पवार यांनी केलं. आभार उमेश काटे यांनी मानले.

Add Comment

Protected Content