अमळनेर तालुक्याची आनेवारी कमी लावावी; जिल्हा किसान काँग्रेसचे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुका व जिल्ह्यात लावण्यात आलेली आनेवारी जास्तीची लावण्यात आले असून ती कमी करण्यात यावी अशी मागणी, जळगाव जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुका व जिल्ह्यात अगोदर जून व जुलै महिन्यात पर्जन्यमान हे ५० टक्क्यापेक्षा कमी होते. त्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली. तसेच जून व जुलै पेरणी केलेले ठिबक तुषार, सिंचन आणि इतर मार्गाने बागायती कापूस शेतकऱ्यांनी जागविला होता, तो बागायती कापूस सुद्धा आता ऑगस्ट व सप्टेंबर च्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. म्हणजेच सुरुवातीला कमी पावसामुळे व आता अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम हाताबाहेर गेला आहे. त्यामुळे कोणतेही पीक शेतकऱ्यांच्या हातात देऊ शकत नाही म्हणून आनेवारी ही जास्तीची आहे ते कमी करण्यात यावी, अशी मागणी केला निवेदन केले आहे.

या निवेदनावर किसन काँग्रेस कमिटीचे सचिव एकनाथ गायकवाड, सुरेश पाटील, प्रा.सुभाष पाटील यांच्या सह अन्य जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content