भुसावळ येथे आरोग्य विभागातर्फे कोरोनाबाबत जनजागृती

भुसावळ, प्रतिनिधी । आरोग्य विभागाने भुसावळ तालुक्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे व नगरसेवक पिंटू कोठारी यांनी वैद्यकीय पथकाला संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी कोरोना सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींना शोधून काढण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागाने स्वीकारले आहे. यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजाराच्या संसर्गाची तीव्रता किती आहे हे पाहून त्यासंदर्भातील निर्णय़ घेण्यात येणार आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी भुसावळ शहर व तालुक्यात हे सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोरोना सदृश रुग्णशोध आणि जागरूकता अभियान हाती घेण्यात आले आहे. डॉक्टर व परिचारिका यांच्या पथकांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे. भुसावळ शहर आणि भुसावळ ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनमधील वस्त्यांमध्ये जाऊन ही पथके व्यक्तींची तपासणी करणार आहे. या वैद्यकीय पथकाला त्यांच्या सुरक्षेसाठी ५०० फेस मास्क, २०० हॅन्ड ग्लोव्हज, ५ लिटर सॅनिटायजरच्या दोन कॅन, ४ स्प्रे बॉटल असे साहित्य जिप सदस्या पल्लवीताई सावकारे व नगरसेवक पिंटू कोठारी यांच्याकडून देण्यात आले. दरम्यान, मागील महिन्यात २९ तारखेला कॉटन सेल संचालक प्रमोद सावकारे यांच्या उपस्थितीत साहित्य देण्यात आले होते. डॉ. प्रमोद पांढरे, डाॅ. संगीता पांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Protected Content