भुसावळ येथे ‘त्या’ पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी

WhatsApp Image 2020 01 14 at 7.08.47 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील संविधान बचाओ समितीतर्फे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बंदी आणावी व पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

संविधान बचाव समितीतर्फे प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागुन सत्तेवर आलेल्या भाजपाने नरेंद्र मोदीची तुलना आता शिवाजी महाराजांशी करून शिवरायांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे बहुजनांचे राजे होते. सर्व जाती धर्माना समान न्याय देणारे राजे होते. त्यांनी कधी कुठल्या जाती धर्माचा ‌‌द्वेष केला नाही. हे वादग्रस्त पुस्तक भाजपाचे जयभगवान गोयल यांनी लिहिले आहे. गोयल यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रांताधिकारी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी साबीर शेख, मझहर शेख, अझहर शेख, इमरान खान, जुनेद खान, साजिद बागवान, सलीम सेठ चुडीवाले, मुन्नावर खान, शेख रफिक आदी उपस्थित होते.

Protected Content