रावेर प्रतिनिधी । रावेर कोविड केअर सेंटरची जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी भेट दिली. यावेळी क्वारंटाईन असलेल्या रूग्णांच्या जेवणाच्या प्रश्नावरून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची काहीही कारण नसतांना कानउघडणी केली.
गुरूवारी २८ मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रावेरातील कोविड सेंटरला भेट दिली. कोविड रूग्णालयातील रूग्णांना पुरविण्यात येणारे जेवण पाहून जिल्हाधिकारी नाराज झाले. पार्सल पन्नी व अल्प प्रमाणात जेवण मिळत असल्याचे पाहून मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना खडेबोल सुनावले. १५० रूपये शासन देत असतांना त्या प्रमाणात जेवणाचा दर्जा नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकने यांनी निकृष्ट जेवणा बद्दल घेतलेली दखल स्वागतार्य आहे. त्यांनी घेतलेल्या दखल बद्दल त्यांचे कौतुक देखिल होत आहे. पण वड्याचे तेल वांग्यावर काढल्याची चर्चा रावेर कोविड सेंटरच्या रुग्णामध्ये होती. वास्तविक जेवण पुरण्याची जबाबदारी नसतांना रावेर पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना जेवणाच्या प्रश्नावरून नाहक खडेबोल ऐकावे लागले. रावेर पालिकेकडे स्वच्छता, पाणी पुरवठा, बिल्डिंग संबधातील सोई-सुविधा पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून नाहक झपाईची दिवसभर एकच चर्चा सुरू होती.