रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागातून पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आले.
हा रूट मार्च पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आले. यात स्टेशन रोड, मेन रोड, चावडी भाग, नागझिरी भाग, थडा परीसर, छत्रपती शिवाजी चौक, कारागिर नगर, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यासह आदी भागातून पोलिसांनी रूट मार्च केला. यामध्ये पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सपानि शितलकुमार नाईक, पोउनि विशाल सोनवणे, मनोहर जाधव यांनी सहभाग घेतला होता. रूट मार्चमध्ये पोलिस, एसआरपीएफ, दंगा नियंत्रण पथक होमगार्ड यांचा सहभाग होता.