विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर रविंद्रनाना पाटील यांची नियुक्ती

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विभागीय रेल्वे सल्लागार समितीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील यांची नियुक्ती केली आहे. दिल्ली येथील रेल्वे बोर्डाचे व्यवस्थापक संजय मनोचा यांनी ही नियुक्ती केली आहे.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य रविंद्रनाना पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. साकेगाव सारख्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा एक सच्चा कार्यकर्ता ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदापर्यंतची वाटचाल आपल्या उत्कृष्ट संघटन शैलीमुळे रविंद्रनाना पाटील यांनी करून दाखवली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तालुका युवक संघटक, युवक जिल्हा उपाध्यक्ष, भुसावळ तालुकाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी सांभाळली आहेत. सध्या जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिक्षण समिती सदस्य, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यासह विविध पदांवर सध्या ते कार्यरत आहेत. जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात केलेली विविध कामे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेली पक्षबांधणी, तळागाळातील जनसामान्यांच्या समस्या सोडवून पक्षबांधणीसाठी सातत्याने सक्रिय असणारे रविंद्र नाना पाटील यांच्या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याने त्यांची रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!