रायपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा अतिरिक्त पदभार उपसंरपचांकडे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील रायपूर येथील सरपंचाच्या ठिसाळ कारभाराविरोधात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे सरपंचपदाचा अतिरिक्त पदभार उपसंरपच प्रविण लक्ष्मण परदेशी यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपसरपंच प्रविण परदेशी यांनी सोमवारी २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीत ७ सदस्य निवडून आले आहे. त्यात निर्वाचित संरपच म्हणून रजनी नितीन सपकाळे या काम पाहत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायत कामांचे शासकीय कागदपत्रे व दस्तावर स्वाक्षऱ्या करीत नाही, त्यामुळे गावातील कोणतेही काम होत नाही. ग्रामपंचायतीचे काम करतांना सदस्यांना विश्वासात घेत नाही, सरपंच पती नितीन सपकाळे हे शासकीय कामात हस्तक्षेप करत होते.  रायपूर हद्दीतील अतिक्रमण काढण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. जगार हमी योजनेंतर्गत कामांच्या प्रस्तावावर सही करण्यास नकार दिला होता. ग्रामसभा घेण्यास नकार देत आहे. निधीचा दुरूपयोग करून इतर सामान खरेदी केले जात होते. यासह इतर कामांकडे साफ दुर्लक्ष केले जात होते. या अनुषंगाने इतर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव तयार करून जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांना पाठविण्यात आला होता. त्यानुसार तहसीलदार नामदेव पाटील यांनी रायपूर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेवून अविश्वासाचा ठराव मंजूर केला. त्यामुळे सरपंचपद रिक्त होते. जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत पाटील यांनी आदेश काढत सरपंच पदाचा पदभार उपसरपंच प्रविण लक्ष्मण परदेशी यांच्याकडे देण्यात आला आहे. अशी माहिती उपसरपंच सदस्य प्रविण परदेशी यांनी  सोमवारी २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता दिली आहे.

Protected Content