दिलासादायक : जिल्ह्यात आज १२१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. यात जिल्ह्यात आज १२१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ४५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर -११, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-२८, अमळनेर-११, चोपडा-१६, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-६, एरंडोल-२, जामनेर-११, रावेर-६, पारोळा-१, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-२, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा १ असे एकुण १२१ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,४५४, जळगाव ग्रामीण-२४५४, भुसावळ-३५७२, अमळनेर-४२४४, चोपडा-४२३४, पाचोरा-१८७४, भडगाव-१८२८, धरणगाव-२१४४, यावल-१६५३, एरंडोल-२७८०, जामनेर-३८४९, रावेर-२०७६, पारोळा-२४३९, चाळीसगाव-३३४९, मुक्ताईनगर-१६३६, बोदवड-७९५ आणि अन्य जिल्हा ४०५ असे आज एकुण ५० हजार ७८६ रूग्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९१.०३ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५० हजार ७८६ रूग्ण आढळून आले असून ४६ हजार २२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२१९ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ३ हजार ३३८ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content