राज्य लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : वृत्तसंस्था । राज्य लोकसेवा आयोगाने ११ ऑक्टोबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी विविध संघटना, नेत्यांकडून होत होती.

या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरली होती. खासदार संभाजी राजे यांनी ही परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता.

यापूर्वी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ती आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Protected Content