मुक्ताईनगर : प्रतिनिधी । तालुक्यातील बुऱ्हाणपूर रोडवरील रामगड शिवारात केळीच्या बागेचा सहारा घेत पत्त्याचा रंगलेला डाव मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री उधळून लावला़ 1 लाख 7 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ६ पैकी ५ आरोपी पसार झाले एकास अटक करण्यात आली़ आहे.
रामगड शिवारात केळीच्या बागेत आडोश्याला मोठ्या अवैध उलाढालीचा पत्त्यांचा डाव सुरु असल्याची गुप्त माहिती पो नि रामकृष्ण पवार यांना मिळाली़ मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने 3 मेरोजी छापा टाकला़ या ठिकाणी सहा जणांचा डाव रंगलेला होता.परंतु पोलिसांनी धाड टाकताच केळीच्या बागातून पळून जाण्यास पाच जणांना यश आले तर पोलिसांनी शेख हमीद शेख सलीम (शिकारपुरा, बुऱ्हाणपूर), या संशयितांस अटक केली त्यांच्याजवळून 730 रुपये रोख, 5 महागडे मोबाईल , 5 दुचाकी यासह सट्टा जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 7 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़.
पो नि रामकृष्ण पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी संतोष नागरे, गणेश चौधरी, गणेश मनुरे, अंतुर्ली दुरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली़.तपास हवालदार गजमल पाटील करीत आहेत
दरम्यान, येथे रंगलेल्या डावात मुक्ताईनगरचे राजकारणी होते.पोलीस येताच त्यांनी पोबारा केला असल्याची चर्चा असून त्यांच्या पाचही मोटार सायकली मात्र पोलिसांच्या हाती लागलेल्या असून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या शेख हमीदकडून उर्वरीत जुगाऱ्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे.