कानळदा येथील विवाहितेला ५० हजारांसाठी छळ

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी मारहाण करत छळ केल्याच प्रकार गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई मुकेश कोळी (वय-३२) यांचा विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे १५ दिवस चांगले गेले त्यानंतर विवाहितेला माहेराहून दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही. विवाहितेला शिवीगाळ करत “पैसे आणले नाही तर तू कशी नांदते आम्ही बघतोच” अशी धमकी देत मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानळदा येथील माहेर असलेल्या रत्नाबाई यांचा विवाह चोपडा तालुक्यातील सुटकार येथील मुकेश कोळी यांच्याशी झाला. लग्नानंतर १५ दिवसांनी विवाहितेकडे पैशाची मागणी करीत तिचा छळ केला जाऊ लागला. वारंवार शिवीगाळ करीत मारहाण होत असल्याने विवाहिता माहेरी निघून आली. याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती मुकेश कोळी, सासरे दगा कोळी, सासू चंद्रभागा कोळी, मावस सासरे जगन सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश कांबळे करीत आहेत.

Protected Content