धरणगाव तालुक्यातील जवानाला कर्तव्यावर असतांना वीरमरण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रोटवद येथील जवान विनोद जवरीलाल शिंदे या जवानाला कर्तव्यावर असतांना वीरमरण आले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रोटवद येथील विनोद जवरीलाल शिंदे हा तरूण सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत होता. आज कर्तव्यावर असतांना त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आल्यानंतर परिसरावर शोककळा पसरली.

दरम्यान, जवान विनोद शिंदे यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

Protected Content