मुंबई (वृत्तसंस्था) एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांचे एकूण उत्पन्न १७.५ अरब डॉलर म्हणजेच जवळपास १,२५,००० कोटी रुपये आहे. दमानी यांना डी-मार्ट रिटेल चेनसाठी देशभरात ओळखले जाते.
फोर्ब्स रियल टाईम बिलिनियरीज इंडेक्सनुसार, गेल्या आठवड्यात एव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर ५ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे दमानी यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शनिवारी दमानी यांचे उत्पन्न १७.८ अरब डॉलर पर्यंत पोहोचलं. त्यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे शिव नाडर (१६.४ अरब डॉलर), उदय कोटक (१५ अरब डॉलर) आणि गौतम अदाणी (१३.९ अरब डॉलर) यांचा क्रमांक लागतो. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत, त्यांचे एकूण उत्पन्न 57.4 अरब डॉलर इतके आहे.