माझगावच्या जीएसटी भवनला भीषण आग

aag

 

मुंबई (वृत्तसंस्था) माझगाव येथील जीएसटी भवनला भीषण आग लागली आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

जीएसटी भवनच्या बाजूला अनेक सरकारी कार्यालये आहेत. आग आटोक्यात यावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरु आहेत. ही आग जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहे. आगीमुळे धुराचे मोठे लोळ परिसरात पसरले आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

Protected Content