भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी- अशोक चव्हाण यांचा सल्ला

ashok chavhan

मुंबई प्रतिनिधी । भाजपने सरकार पाडण्यासाठी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणे सोडून विरोधी पक्षाची जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडावी असा सल्ला आज सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षातील नेते आणि मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याने हे सरकार कधीही पडू शकते असं विरोधीपक्षांच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर यावरून माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून टोला लगावला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ”भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने; पाहणं बंद करावं. महाविकासआघाडी सरकारचं काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.”

या संदर्भात अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीमधील तीनही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे. कुठलेही वादाचे मुद्दे येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. तरीही असा एखादा मतभेद असल्याचा विषय समोर आल्यास, तो प्रश्‍न सोडवण्यासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थित चर्चा होऊ शकते.

Protected Content