राणा दाम्पत्याची हायकोर्टात धाव

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – अमरावतीचे आमदार आणि खासदार राणा दाम्पत्याचा विरुद्ध राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या विरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई  तसेच राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खा.नवनीत राणा, आ. रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा खार पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे. यात न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून जामीनासाठीही अजून चार दिवस तिष्टत राहावे लागणार आहे. परंतु राणा दाम्पत्याने बाहेर पडण्यासाठी धावाधाव करीत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

महाविकास आघाडी सरकारने राणा दाम्पत्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप न्यायालयात करण्यात आला होता. राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी यावर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रविवारी म्हटले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा मागणीच्या दाखल याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राणा दाम्पत्यानी केली आहे. या याचिकेवर दुपारी दोन ते अडीच वाजेनंतर वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.

Protected Content