गिरणा नदीपात्रातून आवर्तन सोडण्याची निवेदनाद्वारे मागणी

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी*| तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे बहुतेक ग्रामपंचायतीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्याअनुषंगाने गिरणा नदीपात्रातून आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील करगांव, इच्छापूर तांडा , चैतन्य तांडा , तरवाडे, तलवाडे व टाकळी प्र.चा या ग्रामपंचायतींना गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी हंड्डा घेऊन वणवण भटकावे लागत आहे. त्यात उन्हाचे चटके दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. त्यामुळे माणसांसह गुरेढोरेंचे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत गिरणा नदीपात्रातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी विविध ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवार, २५ एप्रिल रोजी करण्यात आली आहे. निवेदनावर चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता राठोड, सरपंच संतोष राठोड (तलवाडे ग्रा.पं.), विजय गुजर (टाकळी प्र.चा), तुकाराम चव्हाण (इच्छापूर तांडा) व हिरामण महादेव (तरवाडे) आदींनी सह्या केल्या आहेत. तत्पूर्वी येत्या दोन दिवसांतच आवर्तन सोडण्यात येईल असे तहसीलदार अमोल मोरे यांनी आश्वासित केले आहे.

Protected Content