Home Cities चाळीसगाव चाळीसगावात  खा. संजय पाटलांवर कठोर कारवाईची व्हॉईस ऑफ मीडियाची मागणी

चाळीसगावात  खा. संजय पाटलांवर कठोर कारवाईची व्हॉईस ऑफ मीडियाची मागणी

0
3


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत चाळीसगाव व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न जनतेसमोर मांडण्याचे काम तो प्रामाणिकपणे करत असतो. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे हे निषेधार्ह असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. चाळीसगाव व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनातून खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, शहराध्यक्ष गफार शेख, शहर उपाध्यक्ष रवींद्र कोष्टी, शहर कार्याध्यक्ष महेंद्र महाले, शहर संघटक रणधीर जाधव, शहर सल्लागार आनंद गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष राकेश निकम, तालुका कार्याध्यक्ष अजगर मुल्ला, तालुका सचिव वैभव वाघ यांच्यासह सदस्य खेमचंद कुमावत आणि रोहित शिंदे उपस्थित होते. पत्रकारांच्या सन्मानाचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, पत्रकारांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने मांडण्यात आली.


Protected Content

Play sound