राज्य सरकारी कर्मचा-यांना केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा – भाऊसाहेब पठाण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारी कर्मचा-यांना केंद्राप्रमाणेच वेतन व भत्ते लागू केले आहेत.  राज्य सरकारनेही केंद्राप्रमाणे कर्मचा-यांना ३८ टक्के महागाई भत्ता द्यावा आणि तसे आदेश निर्गमित करावे अशी मागणी भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

राज्य सरकारी गट “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारी कर्मचा-यांना केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा अशी मागणी केली आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचा-यांना मूळ वेतनावर ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता केंद्र सरकारने जुलै – २०२२ पासून ३८ टक्के महागाई भत्ता मंजूर केला आहे. सध्या दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असल्याने दिवाळीपूर्वी ३८ टक्के महागाई भत्ता राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांना मंजूर केल्यास त्याचा मोठा दिलासा मिळेल. तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यवाही करावी असे आवाहन देखील भाऊसाहेब पठाण यांनी केले आहे.

Protected Content