महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यास शासनाची मंजुरी

koli samaj

चोपडा प्रतिनिधी । रामायणकार, आद्यकवी, गुरुदेव, महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यास शासनातर्फे नुकतीच मंजूरी देण्यात आली असून या निर्णयामुळे कोळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आतापर्यंत देशभरात आदिवासी कोळी जमातीतर्फे महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापासून आठवडाभर मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत होती. यापुढे शासनातर्फे महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक (क्रमांक. 2219/प्र.क्र.71/29), दि.12 डिसेंबर 2019 नुसार सन 2020 मध्ये राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

त्यात अ.क्र.30 वर महर्षि वाल्मिकी जयंती (तिथीनुसार) भारतीय महिना व दिवस ९ कार्तिक, शके 1942, दि.31 ऑक्टोबर 2020, शनिवार रोजी साजरी करण्यात येऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे, याबाबतच्या आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या शासन निर्णयाचे आदिवासी कोळी जमातीत स्वागत होत असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी या पत्रकान्वये दिली आहे.

Protected Content