पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील उत्राण ४८ वर्षीय व्यक्ती हे पाचोरा तालुक्यातील सामनेर येथून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून बेपत्ता झालेल्या इसमाच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता इसमाचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवाशी दशरथ भिका पाटील (पावजी) वय – ४८ हे रविवारी ९ ऑक्टोबर रेाजी पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे रंभाई मातेच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान यात्रोत्सव संपल्यानंतर दशरथ पाटील हे सामनेर येथेच नातेवाईक अरुण हिम्मत पाटील यांचेकडे थांबले होते. दि. ११ आॅक्टोबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास दशरथ पाटील हे कोणासही काही एक न सांगता सामनेर येथुन अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. दरम्यान नातेवाईक अरुण हिम्मत पाटील रा. सामनेर ता. पाचोरा यांनी सर्वत्र शोध घेतला असता दशरथ पाटील हे मिळुन न आल्याने दि. १२ आॅक्टोबर रोजी अरुण पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. दशरथ पाटील यांचा शोध पाचोरा पोलिस घेत असुन दशरथ पाटील यांच्या विषयी कोणास काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन देखील पाचोरा पोलिसांकडून करण्यात आले आहे. दशरथ पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचेही नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या खबरीत नमुद केले आहे.