नक्षलवाद्यांचा राज्य सरकारला इशारा; काय आहे कारण !

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नागपूर येथे उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अनुषंगाने नागपूरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतांना नक्षलवाद्यांनी सरकारला पत्र पाठवून इशारा दिला आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज खाणिचा विस्तार त्वरी रद्द करण्याचा यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनला उद्यापासून सुरूवात होत आहे. नक्षलवाद्यांनी सरकारला एक प्रेस नोट काढून इशारा दिला आहे. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा, असे आवाहन देखील दिले आहे. बदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्यूरोने आज हे प्रेस रिलीज काढली आहे..

सुरजागड या ठिकाणी आदिवासींचं पूजा स्थळ असतानाही स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता 2014 मधील भाजप सरकारने स्थानिक आदिवासींच्या तत्कालीन जनसंघर्षाला चिरडून टाकत सुरजागड खाणीत खोदकाम सुरू केले होते. शेकडो हेक्टर क्षेत्रात खोदकामामुळे परिसराची प्रचंड पर्यावरणीय हानी होत असून सर्व प्रकारचं प्रदूषण ही वाढलं आहे. असे असताना सुरजागड मधून आतापर्यंत दरवर्षी तीन मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी असताना आता सरकार ने दर वर्षी दहा मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी बहाल केली आहे

Protected Content