राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

 

मुंबई: वृत्तसंस्था । मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

 

संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.

 

हवामान विभागानं विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट, यलो अ‌ॅलर्ट जारी केले आहेत. कोणत्याही जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. 28 जुलै रोजी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर, 29 जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी 30 आणि 31 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे पालघर, मुंबई, ठाणे आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

अखेर गोंदिया जिल्हावर वरुण राजा खुश झाला असून रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच आहे या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. जिल्हात भात रोवणीच्या कामाला जोमात सुरुवात झाली आहे, असे असले तरी जिल्हात केवळ 39%पाऊस पडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नदी,नाले, तलावात पाणी साठा हव्या त्या प्रमाणात नाही. अजून ही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.

 

Protected Content