फैजपूर येथे अस्थीरोग समस्या व विकारसंबंधी मोफत तपासणी शिबीर

फैजपूर प्रतिनिधी । लेवा उत्थान फाउंडेशन, भुसावळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ, फैजपूर यांच्या वतीने शिवाजी नगरातील ज्येष्ठ नागरिक संघटना, बस स्टँडच्या मागील बाजूस, अस्थीरोग समस्या व विकारसंबंधी मोफत तपासणी शिबीर सकाळी साडेदहा ते सायंकाळी चार या वेळेत घेण्यात आले.

सदर मोफत शिबिरामध्ये हाडांचे विविध विकार असलेल्या एकूण ७७ रुग्णांनी लाभ घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. सदर शिबिरासाठी तपासणी तज्ञ म्हणून नाशिक येथील डॉ. ब्रिजभूषण महाजन (एम.बी.बी.एस., डी.एन.बी. (ऑर्थो), एम.एस. (ऑर्थो),  (Spine & Joint Replacement Expert) हे उपस्थित होते. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष- विलास महाजन, सचिव- रमेश चौधरी,  युवराज भारंबे,  पी. डी. नेहेते,  बी. इ. पाटील,  भागवत चौधरी,  यु. सी. चौधरी,  आशालता चौधरी,  लता चौधरी तसेच लेवा उत्थान फाऊंडेशनचे पदाधिकारी राजेश महाजन,  योगेश पाटील,  सचिन भोळे, विनीत पाटील, जितेंद्र चौधरी इ. यांचे अथक परिश्रम लाभले.

 

Protected Content