राज्यातील ३३ शिक्षकांना राज्य पुरस्काराने सन्मानित

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धुळे येथील कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती व अमळनेर तालुका क्रीडा समिती याच्या संयुक्त विद्यामानाने शिवजन्मोत्सव निमित्ताने अमळनेर शहरातील आयएमए लायन्स हॉलमध्ये पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योउपाध्यक्ष योगेश मुंदडे हे होते.

 

पुरस्कार वितरण जिल्हा परिषदेचे सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न.पा.प्रशासकिय उपअधिकारी संदिप गायकवाड साहेब,पं,समिती माजी सभापती शाम अहिरे, प्रदिप अग्रवाल,डॉ.अनिल शिंदे, डॉ.संदेश गुजराथी,निरज अग्रवाल, विनोद पाटील, कल्याण पाटील, माधुरीताई पाटील,खान्देश केसरी मल्ल  हेमंत गरुड,प्रा.डॉ. ए.बी.जैन,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचेअध्यक्ष  प्रकाश पाटील,अमळनेर येथील जी.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकुर यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 

राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षकरत्न पुरस्कार-२०२३

कुशल जगदीश वर्तक,(विशेष शिक्षक कार्यानुभव-मुंबई पब्लिक पोईस, हिंदी शाळा,क्र-१,सुमेरनगर,बोरिवली, पश्चिम,मुंबई),विनय शहाजी घाडगे(क्रीडाशिक्षक- न्यू इंग्लिश स्कूल,कण्हेर ता.जि.सातारा),यशवंत मधुकर महाजन (कलाशिक्षक- श्री.वाणी विद्यालय स्कूल कल्याण,वेस्ट,ठाणे-मुळगाव कळमसरे-अमळनेर),ह.भ.प.प्रा.डॉ. उदय चंद्रकांत पाटकर ( संगणक विभाग प्रमुख- भारती विद्यापीठ अभियांत्रिक महाविद्यालय,लवळे,पुणे), प्राणजीत प्रभाकर बोरसे (सहशिक्षक- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,डोंगरगाव ता.कन्नड जि.संभाजीनगर), विनायक चैत्राम पाटील (उपशिक्षक-सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,अमळनेर), गजानन रमण चौधरी (मुख्याध्यापक- जिल्हा परिषद शाळा ढेकू सिम ता. अमळनेर जि. जळगाव), हेमंत युवराज पाटील (क्रीडाशिक्षक- आर. के. मिश्रा माध्यमिक विद्यालय बहादरपुर ता. पारोळा जि. जळगाव), चंद्रशेखर किशोर पाटील उपशिक्षक अण्णासो मा.का. पाटील माध्यमिक आश्रमशाळा,रणाईचे ता. अमळनेर जि. जळगाव ), स्वप्निल हिम्मतराव पाटील (क्रीडाशिक्षक- यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बुद्रुक ता.अमळनेर जि.जळगाव ), लक्ष्मण भिवाजी पाईकराव (उपशिक्षक-आदर्श माध्यमिक विद्यालय,हिंगोली), कैलास राजधर बाविस्कर (क्रीडाशिक्षक- जी.एस. हायस्कूल अमळनेर), राजेंद्र तुकाराम बागुल (उपशिक्षक- न्यू इंग्लिश स्कूल प्र.डांगरी ता.अमळनेर जि. जळगाव), उमेश लोटन मनोरे (उपशिक्षक- किसान माध्यमिक विद्यालय जानवे, ता. अमळनेर जि. जळगाव ),सुनील मधुकर देसले (कलाशिक्षक-शासकीय विद्यानिकेतन,धुळे ),प्रा.सचिन इच्छाराम पाटील (क्रीडा संचालक- प्रताप कॉलेज,अमळनेर ), देविदास हिरामण महाजन (क्रीडाशिक्षक-झि.तो.म. माध्यमिक विद्यालय,धानोरा ता. चोपडा जि. जळगाव), प्रभुदास नथ्थू पाटील (उपशिक्षक- स्वर्गीय आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय,मंगरूळ ता.अमळनेर जि.जळगाव)

 

 

राज्यस्तरीय राजमाता माँसाहेब जिजाऊ शिक्षिकारत्न पुरस्कार-२०२३

सौ.धनश्री मनिष सावे,(क्रीडाशिक्षिका-मुंबई पब्लिक पोईस, ” हिंदी शाळा,क्र-१,सुमेरनगर,बोरिवली, पश्चिम,मुंबई),सौ.मनिषा त्र्यंबक पवार,(क्रीडाशिक्षिका- कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा,धुळे), कु. पुष्पा कवडूजी गिडकर( कलाशिक्षिका- गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पहेला ता.जि.भंडारा), सौ विजया राजेंद्र गायकवाड,ज्योतिर्मयी श्रीराम बाविस्कर (उपशिक्षिका-भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा,अमळनेर), सौ.वसुंधरा दशरथ लांडगे (उपशिक्षिका-साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर,अमळनेर) प्रेरणा  प्रभाकर सराफ,(उपशिक्षिका-डि.आर कन्या शाळा,अमळनेर जि.जळगाव),कल्पना दगा महंत (उपशिक्षिका-सावित्रीबाई फुले माध्यमिक कन्या हायस्कूल,अमळनेर) यांना पुरस्कार देण्यात आला.

 

राज्यस्तरीय जाणता राजा जीवन गौरव पुरस्कार-२०२३

सुभाष हिरामण निकुंभे (शिरपुर ),हेमंत मांगुलाल गरुड( धुळे),मुख्याध्यापक डी एच ठाकुर (अमळनेर)

पुरस्काराचे स्वरूप:- स्मतिचिन्ह,सन्मानपत्र(फोटो फ्रेमसह),मेडल,बॅच,शाल,गुलाबपुष्प देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.याची सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि शिक्षिका नोंद घ्यावी.

 

या पुरस्कार वितरणाचे संयोजन कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती, धुळे संस्थापक अध्यक्ष हेमंत भदाणे, सचिव राहुल एच.पाटील, उपाध्यक्ष वासुदेव शेलकर, कोषाध्यक्ष योगेश वाघ, अमळनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, निलेश विसपुते, अतुल बोरसे, गोकुळ बोरसे, बापूराव सांगोरे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.वसुंधरा लांडगे तसेच आभार सुनिल वाघ यांनी मानले

Protected Content