जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र योग असोसिएशनच्या वतीने कोरोनाची परिस्तिथी लक्षात घेत दि. ५ – ६ डिसेंबर व १२ – १३ डिसेंबर ह्या रोजी ऑनलाईन माध्यमातून राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील ८ स्पर्धक विजयी झालेत.
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील अनेक स्पर्धकानी सहभाग घेत होता. यात ८ स्पर्धक विजयी ठरले.
जळगाव जिल्ह्याची मुली वयोगट दहा ते बारामध्ये नंदिनी दुसाने हिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक प्रथम क्रमांक पटकावला. मुली १६-१८ वयोगट मध्ये स्नेहल वाणी हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. मुली १६ ते १८ वयोगटातील मध्ये पुनम इंगळे हिने प्रथम क्रमांक सुवर्णपदक पटकावले. माहेश्वरी खेैरनार हिने सहावा क्रमांक पटकावला. पुरुष २१ ते २५ वयोगट हर्षवर्धन शिंदे याने सहावा क्रमांक पटकावला. महिला ३० ते ३५ वयोगट मध्ये दीपिका पाटील यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. पुरुषांमध्ये शेखर शार्दुल याने सहावा क्रमांक पटकावला व महिला प्रोफेशनल वयोगटात खेळणाऱ्या रुद्राणी देवरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय योग पंच व मार्गदर्शक डॉ. अनिता सतीश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. अनिता पाटील, जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन जळगाव जिल्हा सचिव अर्चना महाजन यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.