राज्यस्तरीय पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा खरीप हंगाम 2022 राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकामध्ये उत्पादकता वाढवून बाजी मारली आहे.

 

या पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील खालीलप्रमाणे शेतकऱ्यांची राज्यस्तरावर/विभागस्तरावर निवड झालेली आहे.

 

पिक-खरीप ज्वारी (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1)  ज्ञानेश्वर चिंतामण पाटील, मु. गहुखेड, ता. रावेर राज्यस्तर व्दितीय क्रमांक

2)  अर्जुन दामु पाटील, मु. वडगाव, ता. रावेर राज्यस्तर तृतीय क्रमांक

3)  सुशिल संतोष महाजन, मु खडका, ता. भुसावळ विभागस्तर प्रथम क्रमांक

4)  ज्ञानदेव बाबुराव पाटील, मु.सुसरी, ता. भुसावळ विभागस्तर व्दितीय क्रमांक

5)  श्रावण शेनफड धनगर मु.काहुरखेडा, ता. भुसावळ विभागस्तर तृतीय क्रमांक

 

पिक-बाजरी (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1).  सरदार गिरधर भिल, मु.सांगवी, ता. चाळीसगांव विभागस्तर तृतीय क्रमांक

 

पिक-मका (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1) श्री मोहन काशिनाथ पाटील, मु.होळ, ता. रावेर विभागस्तर प्रथम क्रमांक

2) श्री किशोर हरीश गनवणी, मु. पो. ता. रावेर विभागस्तर तृतीय क्रमांक

 

पिक-तुर (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1) श्रीमती प्रांजली गजेंद्र तायडे, मु.चिंचखेडा बु. ता. मुक्ताईनगर विभागस्तर प्रथम क्रमांक

2)  तेजस प्रविण अग्रवाल, मु. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर विभागस्तर व्दितीय क्रमांक

3)  विश्वनाथ शामु पाटील, मु. पिंप्रिनादु, ता. मुक्ताईनगर विभागस्तर तृतीय क्रमांक

 

पिक-मुग (सर्वसाधारण गट खरीप हंगाम 2022)

1)  विजय छबीलाल पाटील, मु. वाघोदे, ता. अमळनेर विभागस्तर प्रथम क्रमांक

2)  प्रदिप दामोदर पाटील, मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर विभागस्तर व्दितीय क्रमांक

3) श्री नहुष आबा पाटील, मु. पिंगळवाडे, ता. अमळनेर तृतीय क्रमांक मिळविला आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content