राज्यस्तरीय आंतर शालेय बुध्दीबळ स्पर्धेचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आंतर शालेय बुध्दिबळ स्पर्धेचा मंगळवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता समारोप करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते विजेत्या खेळाडूंना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय १७ व १९ वर्षे आतील मुलं आणि मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी या स्पर्धांचा समारोप करण्यात आला. यात २० पदकांमध्ये मुंबई विभागाने १०, पुणे विभागाने ४, अमरावती विभागाने २ तर औरंगाबाद, कोल्हापूर , नशिक आणि नागपूर विभागाने प्रत्येकी १ चषक प्राप्त केले आहे. यावेळी प्रत्येक गटाच्या पाच मुलं आणि मुलींना जैन स्पोर्टस् ॲकडमीच्या वतीने ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्यांना जैन इरिगेशनेच अविनाश जैन, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान, महाराष्ट्र बुध्दीबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारूख शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, मुख्य पंच स्वप्निल बनसोड यांच्याहस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताळे व यशवंत बापट, जिल्हा संघटनेचे नंदलाल गादिया, ॲड. अंजली कुलकर्णी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी व संजय पाटील आदींची उपस्थिती होती.
अविनाश जैन यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्या दिल्या क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी समारोपीय प्रस्तावना सादर केली. फारूक शेख यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला तर मीनल थोरात यांनी आभार मानले.

Protected Content