बजरंग बोगद्याजवळ अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह मयत स्थितीत आढळून आला आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील बजरंग रेल्वे बोगद्याजवळ आज रविवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एका अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा मृतदेह रेल्वे खंबा क्रमांक ४१७ / २५-२६ अप लाईनवर जवळ घडली. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही.  आत्महत्या की रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही.  घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक गुप्ता यांच्या फिर्यादीवरून जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दामोदर सोळंखे, पोलीस नाईक अनिल नायडू करीत आहे. 

 

Protected Content