राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त व्याख्यान

धुळे प्रतिनिधी । राजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील झेड. बी. महाविद्यालयात इतिहासाचे अभ्यासक प्रशांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंखे, व्हाइस चेअरमन प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, महाविद्यालयाच्या कमिटीचे चेअरमन सुधीर पाटील, पी. डी. दलाल आदी उपस्थित होते. प्रशांत देशमुख म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्याचे बाळकडू पाजले. त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान दिले. त्याचबरोबर त्यांना शस्त्रविद्येत पारंगत केले. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना परस्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण दिली. रयतेचे रक्षण करून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे शिकवले. स्वराज्यावर येणार्‍या संकटात त्या महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Add Comment

Protected Content