मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार करीत राज्य सरकारलाच आव्हान दिले. यानंतर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नेमके या दरम्यान ‘राजद्रोह’ कलमाचा गैरवापर होत असून ते कलम रद्द करा, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी द्वीसदस्यीय चौकशी समिती कडून शरद पवार यांना फेब्रुवारी अखेर साक्ष देण्यासाठी बोलावले होते. परंतु अतिरिक्त प्रतिज्ञापत्र देण्याचे सांगून वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ११ एप्रील रोजी पवार यांनी अतिरीक्त प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
यात पवार यांनी , राजद्रोह कलम १२४-अ हे इंग्रज काळातील असून स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी भारतीय दंड विधानात समावेश करण्यात आला होता. इंग्रज सरकार जाऊन ७५ वर्ष होऊनही हे कलम रद्द केलेले नसून अलीकडील सरकार विरोधी भूमिका मांडणाऱ्या विरुद्ध या कलमाचा वापर केला जात असल्याचे मत भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर दिलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मांडले आहे.
त्यात राणा दाम्पत्याच्या विरुद्ध ‘राजद्रोह’ कलमाचा वापर केला गेला याला अनुसरून नसले तरी देशभरात अनेक ठिकाणी ‘राजद्रोह’ कलमाचा गैरवापर केला जात असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला दिलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.