धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांना परवानगी देवू नये

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरात दि. २५ डिसेंबर रोजी “हिंदू जनजागृती सभे”तर्फे होणाऱ्या कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण  करणाऱ्या भाषणास पायबंद घालण्यात यावी अशी मागणी  जळगाव जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की,  दरवर्षी जळगाव शहरात “हिंदू जनजागृती सभे” या संघटनेचे कार्यक्रम सार्वजनिक स्थळावर होत असतात. या सभेमध्ये इतर धर्म व धर्मियांबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे व धर्माधर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य वक्तांकडून केले जाते. अशा विखारी वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन जळगाव शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या सभेस परवानगी नाकारण्यात यावी ही नम्र विनंती. या सभेस परवानगी दिली व या सभेत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य झाल्यास संबंधित वक्त्यांवर व आयोजकांवर कायदेशिर गुन्हे दाखल करून अशा प्रवृत्तींना पायबंद घालावा. निवेदनावर सुरेंद्र पाटील, सुमित्र अहिरे, राजश्री अहिरे, अम्रिता नेतकर, मुकुंद सपकाळे, अपर्णा निकम, किरण निकम, निलू इंगळे आदींची स्वाक्षरी आहे.

Protected Content