ममुराबाद-विदगाव रस्त्यावर ट्रक पलटी; तरुण ठार तर ७ जण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ममुराबाद विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापसाने भरलेला ट्रक पलटी झाला. अपघातात तरुण जागीच ठार झाला असून ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

राज रवींद्र अहिरे-भिल (वय-२०, रा. मुंगटी ता. जि. धुळे) असे महेश झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील ट्रक क्रमांक (एमएच १८ एए १०८०) हा ट्रक मुजरासह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरणे करण्यासाठी गेला होता. गुरुवारी १५ डिसेंबर सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते वीदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात राज रवींद्र अहिरे भिल (वय-२०, रा. मुंगटी, ता.जि. धुळे ) हा तरुण जागीच ठार झाला तर प्रमोद संभाजी पाटील (वय-४०), भरत दगडू पाटील (वय-३२), दिगंबर दिलीप पाटील (वय-३०), रवींद्र बारकू भिल अहिरे (वय-५०), जितेंद्र पवार (वय-३५), निंबा दगडू पाटील (वय-३६) आणि बुधा पाटील (वय-६०) सर्व राहणार मुंगटी ता. जि.धुळे हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content