कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात खासदार उन्मेष पाटील यांचे मार्गदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान प्रशाळेत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. या उपक्रमांतर्गत खासदार उन्मेष पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

 

आज दि. १९ मे रोजी रसायन तंत्रज्ञान प्रशाळेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खासदार उन्मेष पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी खासदार पाटील यांनी सांगितले की, यश हे बाजारात विकत मिळत नाही ते अभ्यास करुन व अथक प्रयत्नांतून मिळवावे लागते. याकरीता विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शिक्षणाची ही चार वर्षे विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असतो. त्याचा क्षण-क्षण उपयोगात आणून ज्ञान अर्जिैत केले पाहिजे. इतरांशी वाद करण्यापेक्षा संवाद साधावा. इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यातील उणीवा दूर कराव्यात असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे दिली. अध्यक्षीय समारोप संचालक जे.बी. नाईक केला. परिचय प्रा.उत्कर्षा ग्वालवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. उस्मानी यांनी केले. आभार प्रा.दीपाली भोळे यांनी मानले. यावेळी बी.टेक. केमीकल टेक्नॉलॉजी व केमिकल इंजिनिअरींगचे विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content