मुंबई (वृत्तसंस्था) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ च्या आवारात तोडफोड केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत एकास ताब्यात घेतले आहे.
काल सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्यादरम्यान एका अनोळखी इसमाने राजगृह या माटुंगा पूर्व स्थित इमारतीच्या गार्डनमधील फुलझाडांच्या कुंड्या पडून नासधूस केली आणि इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी भीमराव यशवंतराव आंबेडकर (६०) यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ४४७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, अन्य पुराव्यांच्या आधारे सध्या एका व्यक्तीस ताब्यात घेतली असून त्याची कसून सुरु चौकशी आहे.