राका टायर्ससमोर भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जळगाव औरंगाबाद रोडवर राका टायर्ससमोरुन जात असलेल्या व्यक्तीला दुचाकीने धडक दिल्याची घटना गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात अयोध्यानगरातील वसंत मदन चव्हाण हे जखमी झाले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहराील अयोध्यानगरात वसंत मदन चव्हाण हे वास्तव्यास आहेत. ते गुरुवारी दुपारी जळगाव औरंगाबाद रोडवरुन जात असतांना राका टायर्ससमोर त्यांना भरधाव जात असलेल्या एम.एच. १९ सी.एस.०८६७ या क्रमाकांच्या दुचाकीने धडक दिली. या धडकेत वसंत चव्हाण यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास जखमी वसंत चव्हाण यांचा भाचा राहूल देवीदास राठोड वय २४ याने दिलेल्या तक्रारीवरुन एम.एच. १९ सी.एस.०८६७ या दुचाकीवरील अनोळखी चालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेब अशोक पवार हे करीत आहेत.

Protected Content