मच्छी बाजारात तरुणाला शिवीगाळ करत मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील मच्छी बाजारात एकमेकांकडे पाहिल्याच्या रागातून तरुणाला एकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील तांबापुरा पसिरातील मच्छीबाजारात समीर मुस्तकीन बागवान वय १८ वर्ष हा तरुण राहतो. समीर हा गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घराजवळ असतांना याठिकाणी तांबापुरा परिसरातील गणेश गवळी हा आला. समीरने त्याच्याकडे बघितले, असता याचा राग आल्याने गणेश गवळी याने समीर यास काही एक कारण नसतांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, यात समीर जखमी झाला आहे. याप्रकरणी समीर याने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश गवळी पूर्ण नाव माहित नाही रा. गवळीवाडा , तांबापुरा याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील हे करीत आहेत.

Protected Content