रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्याने तरूण गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने कोंबडी बाजाराकडून दुचाकीने जात असतांना खड्ड्यात दुचाकी गेल्याने तोल जावून खाली पडल्याने तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, गौरव सुरेश चौधरी (वय-25) रा. शनीपेठ, जळगाव हा खासगी कामाच्या निमित्ताने दुचाकीने चित्राचौकाकडून नेरी नाक्याकडे दुचाकीने जात होता. कोंबडी बाजार मार्केट समोर रस्त्याच्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी आवस्थेत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. खिश्यातील मोबाईलच्या काही नंबरला संपर्क करून मित्रांचे मोबाईल नंबर मिळविले. याबाबत मित्रांना माहिती मिळतात जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.

Protected Content