जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जात असलेल्या विद्यार्थ्याचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल लांबवील्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. गिरीश रतन कोळी वय 42 रा. भादली ता. जळगाव असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील भादली गावातील युगल जगदीश रडे वय 19 हा विद्यार्थी शिक्षणाकामी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केट जवळ असलेल्या विवेकानंद नगर येथे राहतो तो मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरून जात असताना, दुचाकीवरून गिरीश रतन कोळी वय 42 हा आला. त्याने युगलचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. या घटनेनंतर युगल रडे याने जिल्हापेठ तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन मोबाईल चोरणारा संशयित गिरीश कोळी यास जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख या करीत आहेत.