अंध बांधवांना नेहरू चौक मित्र मंडळातर्फे किराणा वाटप

जळगाव प्रतिनिधी । येथील नेहरू चौक मित्र मंडळातर्फे अंध बांधवांना मदत म्हणून रविवारी (१६ मे) रोजी किराणा वाटप करण्यात आला. कोरोना महामारीमुळे अंध बांधवांना सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम घेण्यात आला. 

शहरातील १७ अंध बांधवांच्या परिवाराला घरी जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. कोरोना महामारीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताची होती. यातील काही परिवार हे रेल्वेत खेळणी विकून उदरनिर्वाह करतात.  अशावेळी नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांना हि बाब माहित झाली. त्यांनी तातडीने दोन दिवसात व्यवस्था करीत रविवारी या १७ अंध परिवाराला एक महिन्याचा किराणा वाटप केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, विशाल पटेल, तुषार पटेल, सागर मंधान, पियुष गांधी, अभिजित भावासार, जगदीश जोशी, तुषार पटेल, योगेश पाटील, अमोल भावसार, राजू भावसार,रिंकेश गांधी,पंकज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसंगी सुकलाल शिंदे, गणेश तेली, सुरेश पाटील, कैलास ठोमरे, नारायण महाजन, निवृत्ती डोरसे, समाधान हरसोळे, ज्ञानेश्वर गुरव, पंडित हरसोळे, दगडू पाटील, सुनीता बोरसे, युवराज चौधरी, नारायण सोनवणे, विठल पाटील, महेंद्र वानखेडे, मंगलाबाई पाटील, दीपक सोनवणे यांच्या परिवाराला मदत झाली. यावेळी विशाल पटेल, योगेश पाटील, दीपक खैरनार, मुकेश महाराज यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content