मॉस्को (वृत्तसंस्था) रशियाच्या कोरोना लशीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितले. ‘कोविड१९’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
कोरोना व्हायरसवरील रशियाची पहिली लस गॅमलेया संशोधन संस्था आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचण्या १८ जून रोजी सुरु करण्यात आल्या होत्या. चाचणीत सहभागी झालेल्या सर्व ३८ स्वयंसेवकांनी प्रतिकारशक्ती विकसित केल्याची माहिती आहे. ‘कोविड१९’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे, असे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी एका सरकारी बैठकीत जाहीर केले. पुतीन यांच्या कन्येनेही ही लस घेतल्याची माहिती आहे. अलीकडेच व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीला नवीन लस देण्यात आली. काही वेळानंतर तिच्या शरीराचे तापमान वाढले पण आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.