मुक्ताईनगर प्रतिनिधी | यंदाचा सदगुरू सोपानकाका देहूकर संतप्रभृती वारकरी पुरस्कार संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज सद्गुरू सोपानकाका देहुकर संतप्रभृती वारकरी पुरस्कार यंदा संत मुक्ताबाई फडावरील संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांना जाहीर झाला आहे.
आचार्य डॉ.रामकृष्णदास महाराज लहवितकर ट्रस्टतर्फे दिला जाणार्या या पुरस्काराची घोषणा निमंत्रक गंगाधर जाधव यांनी केली. पंढरपुरात १७ ऑक्टोबर रोजी होणार्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख, पोशाख, महावस्त्र, सन्मानपत्र व स्मृति चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार अतिशय मानाचा असून रवींद्रभैया पाटील यांना या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येणार आहे.