रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करुण उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादनाबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांच्या इच्छाशक्ती आणि मनोबल मध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे मोलाचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्यातील एकुण उत्पादनात भर पडेल हा उद्देश समोर ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा रब्बी हंगाम 2021 मध्ये जळगाव जिल्हयात राबविण्यात आली होती.

 

या पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतक-यांची राज्यस्तरावर/विभागस्तरावर निवड झाली असून मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक, संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव आणि उपस्थित वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या शुभहस्ते जिल्हा नियोजन भवन जळगांव येथे सत्कार करण्यात आला.

 

पिक- रब्बी ज्वारी (सर्वसाधारण गट सन २०२१-२२) श्री. प्रमोद बापू माळी, मु. पिपरखेड ता. भडगांव- राज्यस्तर प्रथम क्रमांक, श्री. उमेश दिलीप पाटील, मु वरखेड, ता. भडगांव, राज्यस्तर व्दितीय क्रमांक, श्री रमेश मधुकर पाटील गाव खर्चाणे ता. जामनेर, विभागस्तर प्रथम क्रमांक, श्रीमती लताबाई अशोक महाजन मु.केकतनिभोरे विभागस्तर द्वितीय क्रमांक, श्री. स्वप्नील दत्तात्रय पाटील, सामरोद, ता. जामनेर विभागस्तर

तृतीय क्रमांक,.

पिक- हरभरा (सर्वसाधारण गट सन २०२१-२२) श्री. राकेश वसंत फेगडे, मु. कोरपावली ता. यावल,विभागस्तर तृतीय क्रमांक, पिक हरभरा (आदिवासी गटसन २०२१-२२) सवित्रीबाई भारसिंग बारेला गाव वाघझिरा ता. यावल, विभागस्तर तृतीय क्रमांक या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content