जळगाव प्रतिनिधी । जुन्या जळगावातील मारूती पेठ बागवाना गल्ली परिसरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने गेल्या आठवड्याभरापासून ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरातील मुख्य रस्त्यांवर कनाती व बांबू लावून सिल केला आहे. आतमध्ये कोणालाच प्रवेश नाही, तसेच त्या परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सर्व हालचालींवर नजर ठेवून आहे. या परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती आल्यास त्याची चौकशी व तपासणी केली जात आहे. दरम्यान मारूतीपेठ, भावसान मढी, बागवान गल्ली, रथ गल्ली परिसर, वाणी गल्ली, मोची चौक, जोशी पेठ, भवानी पेठ व पांझरापोळ परिसरातील काही भागही सिल झाला आहे. त्यामुळे परिसरात शांतता दिसून आहे. चारही ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.