यावल शहर व तालुक्यात तिन दिवसाचा लॉकडाऊन : पहिल्या दिवशी सर्वत्र कडकडीत बंद (व्हिडिओ)

 

यावल, अय्युब पटेल । कोरोना विषाणूचा संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तिन दिवसाच्या लॉकडाऊनला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. , सर्वत्र अत्यावश्क आरोग्य विषयी सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय पुर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे .

मागील एक महीन्यांपासुन जळगाव जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचा अत्यंत घातक असा संसर्ग हा वेगाने वाढतांना दिसत असल्याने या कालावधीत अनेक बाधीत रूग्णांचा झपाट्याने मृत्यु होतांना दिसत आहे . दरम्यान यावल तालुक्यात मागील एक महीन्यापासुन कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा पाचशेच्यावर पहोचला आहे . या अत्यंत घातक अशा दुसऱ्या टप्यातील कोरोना संसर्गाने थैमान घातले असून , या उद्भभवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी आज दिनांक २८ मार्च पासुन संपुर्ण जळगाव जिल्ह्यात तिन दिवसाचे लॉकडाऊन लावण्यात आले आला आहे. , आज यावल शहरातील संपुर्ण बाजार पेठा , विविध व्यापारी संकुलन आदी दुकाने ही सकाळ पासुनच पुर्णपणे बंद दिसुन येत आहे . यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी आपल्या पोलीस सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षकदलाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने बंदोबस्त चोख पार पाडला , नगर परिषदचे स्वच्छता अधिकारी शिवांनद कानडे , विजय बडे , वरिष्ठ लिपिक वसुली विभाग राजेन्द्र गायकवाड , असदुल्ला खान, मधुकर गजरे , रवी बारी , अनिल चौधरी यांनी ही लॉकडाऊनच्या परिस्थितीवर नजर ठेवुन होते .लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम हा एसटी बसेसवर दिसुन आला असुन , प्रवासांच्या अत्यल्प उपस्थितीमुळे अनेक बसेस सेवा यावल आगारातुन कमी करण्यात आल्या आहे.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/314660753556459

 

Protected Content