यावल प्रतिनिधी । यावल शहरातील व ग्रामीण परिसरातील आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेतीलत ३६ मंडळांनी आज पाचव्या दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आली.
यावल शहरासह पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीगणेशाची उत्साहात स्थापना केली आहे. आज पाचव्या दिवशी शहरातील १९ व ग्रामीण क्षेत्रातील १७ गणेश मंडळांच्या वतीने आजच्या श्रीगणेशचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षा प्रमाणे यंदा ही कोरोना संसर्गाचे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार श्रीगणेशाची स्थापना करण्याचे आदेश दिल्याने कोणत्याही श्रीगणेशच्या मंडळाच्या वतीने स्थापनेच्या वेळी मिरवणूक काढण्यात आली नसल्याचे पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार स्थापना करावयाची असल्याने एकाही मंडळाने श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत वाजंतत्री लावली नाहीत अतिश्य साद्या पद्धतीने यंदा ही गणपती बाप्पाचे शांततेत विसर्जन करण्यात आले. यावल शहरातील एकुण १९ गणेशोत्सव मंडळानी तथा ग्रामीण क्षेत्रातील डांभुर्णी- ६ , नायगाव एक गाव एक गणपती, सावखेडासिम-३ , दहीगाव- ४ गणेश मंडळांनी व कोरपावलीतील ३ अशा ९४ पैक्की ३६ श्रीगणेश उत्सव मंडळानी या विसर्जन मिरवणुकीत विघ्नहर्ता श्रीगणेशाला निरोप देण्यात आले.
आज शहरात पाच दिवसीय उत्सव असल्याने एक दिवस स्थापने मध्ये तर एक दिवस विसर्जनात जात असल्याने तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने श्रीचे दर्शन व आरास पाहण्यासाठी भाविकांची फारशी गर्दी मात्र दिसुन आली नाही . कोरोनाचे संकट आणी नियमांची मर्यादा यामुळे यंदा ही गणेशोत्सवात युवावर्गात फारसा उत्साह दिसुन आला नाही.
गणेश स्थापनेसह सह विसर्जन उत्सव शांततेत पार पडावा यासाठी येथील महसूल व पोलिस विभागाच्या वतीने गणेश मंडळा कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर सर्व सार्वजनिक श्रीगणेश मंडळाच्या कार्यकर्तांनी शासनच्या नियमांचे काटेकोर पालन करीत पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला , दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व फैजपुर विभागाचे प्रभारी उप पोलीस अधिक्षक विवेक लावंड हे आज सकाळ पासुनच यावल शहरातील श्रीगणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर लक्ष ठेवुन होते. श्रींचे विसर्जन शांततेच्या वातावरणात संपन्न झालेत.
यावेळी पोलीस निरिक्षक पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठान यांच्यासह ३० पोलीस कर्मचारी यावल पोलीस स्टेशन तर बाहेरून ६० पोलीस कर्मचारी तथा गृहरक्षकदला ४० कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला.