यावल महाविद्यालयात ऑनलाईन ‘हिंदी दिवस’ साजरा

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकसह कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभाग व कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जे.आर.शेख ( निवृत्त शिक्षक, साने गुरुजी माध्य.व उच्च माध्य.विद्यालय.यावल ) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुधा खराटे यांनी भूषवले. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली  हिंदी दिवस कार्यक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण सोनवणे सर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आप-आपसात संबंध ठेवण्यासाठी हिंदी भाषा किती उपयुक्त आहे. याचे महत्व विशद केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जे.आर.शेख यांनी कार्यक्रमात ‘हिंदी की दशा और दिशा’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. दूरदर्शन, सिनेमा आणि जाहिरात यांचे हिंदी भाषेचे प्रचार- प्रसार मध्ये महत्त्वाचे योगदान आहे. व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुधा खराटे यांनी विचार व्यक्त केले की, प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक हिंदी भाषेचा प्रयोग करावा. ऑनलाईन कार्यक्रमाला बहुसंख्य  विद्यार्थी हजर होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन  व सूत्रसंचालन अरुण सोनवणे यांनी केले तर आभार सी.के पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, संजय पाटील व डॉ पी व्ही पावरा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content